भारतात येणार ३ दमदार बाईक्स!

Automobile

23 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda २४ जुलैला भारतात नवीन प्रीमियम बाइक्स लाँच करण्याची शक्यता आहे. या लाँचकडे बाइकप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Honda चे मोठे सरप्राईज!

Picture Credit: pinterest

Honda कडून CB500 Hornet, CBR500R आणि XL750 Transalp सारख्या मॉडेल्सपैकी काही बाईक्स भारतीय बाजारात सादर होण्याची चर्चा आहे.

कोणत्या बाइक्स येऊ शकतात?

ही नेकेड स्ट्रीटफायटर बाइक आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि आधुनिक फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे. शहर आणि हायवे दोन्हीसाठी ती योग्य ठरू शकते.

CB500 Hornet ची खासियत

फुल-फेअर्ड स्पोर्ट्स बाइक शोधणाऱ्यांसाठी CBR500R एक उत्तम पर्याय ठरू शकते. तिचे एरोडायनॅमिक डिझाइन आणि आरामदायी रायडिंग पोझिशन लक्षवेधी आहे.

स्पोर्टी CBR500R

लांब पल्ल्याच्या टूरिंगसाठी तयार करण्यात आलेली ही ADV बाइक ऑफ-रोड आणि हायवे दोन्ही ठिकाणी दमदार कामगिरी देऊ शकते.

Adventure प्रेमींसाठी XL750 Transalp

Honda प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी BigWing डीलरशिप नेटवर्कद्वारे नवीन मॉडेल्स आणत आहे.

BigWing नेटवर्कवर भर

या बाइक्सची स्पर्धा Kawasaki, Triumph, Royal Enfield आणि KTM च्या प्रीमियम मॉडेल्सशी होण्याची शक्यता आहे.

कोणाशी होईल टक्कर?

Honda ने अद्याप अधिकृत तपशील जाहीर केलेले नसले तरी प्रीमियम बाइक सेगमेंटमध्ये मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. लाँचनंतर सर्व माहिती स्पष्ट होईल.

लाँचकडे सर्वांचे लक्ष