Honda CB300F Twister: Petrolसोबत Ethanolवरही धावते, पाहा काय आहेत फीचर्स

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2027 Honda CB300F Twister ने नव्या अपडेट्ससह एंट्री केली असून Flex-Fuel क्षमतेमुळे ही बाइक विशेष ठरते.

Hondaची नवी बाइक चर्चेत!

Picture Credit:honda

अपडेटेड हेडलॅम्प, मस्क्युलर फ्युएल टँक आणि नव्या डिझाइनचे टँक श्राउड्स बाइकला अधिक स्पोर्टी लूक देतात.

लूकमध्ये मिळाले नवे बदल

Picture Credit:honda

या बाइकची खासियत म्हणजे ती पेट्रोलबरोबर Ethanol इंधनावरही चालू शकते. त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर शक्य होतो.

पेट्रोलसोबत Ethanolही!

Picture Credit:honda

CB300F Twister मध्ये 293.5cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. पेट्रोलवर हे इंजिन सुमारे 24.5 bhp पॉवर आणि 25.6 Nm टॉर्क देते.

293.5cc इंजिनची ताकद

Picture Credit:honda

Ethanol वापरल्यास पॉवर सुमारे 24.7 bhp आणि टॉर्क 26.2 Nm पर्यंत पोहोचतो. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.

Ethanolवर कामगिरी आणखी थोडी वाढते

Picture Credit:honda

बाइकचे वजन 142 किलो असून तुलनेने हलक्या वजनामुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये हाताळणे सोपे होण्याची शक्यता आहे.

142 किलो वजनामुळे चपळ राइड

Picture Credit:honda

Dual-Channel ABS, Honda Selectable Torque Control म्हणजेच Traction Control, LED लाइटिंग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसारखी फीचर्स मिळतात.

सेफ्टी फीचर्सही दमदार

Picture Credit:honda

CB300F Twister मध्ये 14.2 लिटर क्षमतेची टाकी देण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये बाइकचे ABS आणि S असे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

14.2 लिटरची फ्युएल टँक

Picture Credit:honda

ब्राझीलमध्ये या बाइकची किंमत सुमारे BRL 26,880 आहे. मात्र भारतात 2027 Honda CB300F Twister लॉन्च करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतात येणार का?

Picture Credit:honda