फराळ नावाचा इतिहास माहिती आहे का?

Life style

18 October, 2025

Author:  नुपूर भगत

‘फराळ’ हा शब्द संस्कृतमधील ‘फलाहार’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “फळांपासून बनवलेला आहार” असा होतो.

"फराळ’ शब्दाचा उगम

Picture Credit: Pinterest

काळाच्या ओघात फलाहार हा शब्द बोलचालीत फराळ असा उच्चारला जाऊ लागला.

 फलाहार ते फराळ

Picture Credit: Pinterest

दिवाळी सणात लोक आपल्या नातेवाईकांना घरगुती स्नॅक्स देतात. त्यामुळे दिवाळीतील हे सर्व पदार्थ “फराळ” म्हणून ओळखले जाऊ लागले.

दिवाळीशी संबंध

Picture Credit: Pinterest

पूर्वी फराळ म्हणजे फक्त उपवासाचे हलके पदार्थ होते, पण नंतर त्यात चकली, लाडू, करंजी, चिवडा असे पारंपरिक दिवाळीचे पदार्थ समाविष्ट झाले.

 पदार्थांची विविधता

Picture Credit: Pinterest

मराठी घरांमध्ये दिवाळीच्या आधी फराळ तयार करणे ही एक मोठी परंपरा झाली.

सांस्कृतिक परंपरा

Picture Credit: Pinterest

दिवाळीचा फराळ फक्त अन्न नाही, तर तो नातेसंबंध मजबूत करण्याचा एक मार्ग आहे.

 सामाजिक महत्त्व

Picture Credit: Pinterest

आज “फराळ” शब्दाचा अर्थ दिवाळीतील खास घरगुती पदार्थांचा समानार्थी शब्द झाला आहे, जो चव, प्रेम आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.

आजचा अर्थ

Picture Credit: Pinterest