मानाचा वारकरी निवडीचे नियम आणि धार्मिक महत्त्व

Religion

25 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

निवडीचे प्रमुख निकष 

ती व्यक्ती प्रत्यक्ष पायी वारी करून पंढपुरात आलेली असावी. तसेच महापूजा ही पती पत्नीच्या हस्ते करण्याची असल्याने ते वारकरी दांपत्य असणे अनिवार्य असते.

Picture Credit: Pinterest

ती व्यक्ती खरी वारकरी असावी, तिच्या गळ्यात तुळशीची माळ असावी आणि ती नियमितपणे पंढरीची वारी करणारी असावी. तसेच या पूर्वी कधीही विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा बहुमान मिळालेला नसावा.

गळ्यात तुळशीची माळ असणे

Picture Credit: Pinterest

पारदर्शक निवड

या निवडीमध्ये कोणताही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक प्रभाव चालत नाही. एकादशीच्या मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास मंदिर समितीचे अधिकारी दर्शन रांगेतील एका विशिष्ट क्रमांकावर असलेल्या वारकरी दांपत्याची निवड करतात. निवड झालेल्या वारकऱ्यांना लगेचच सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात आणले जाते.

Picture Credit: Pinterest

एकादशीच्या पहाटे 2.30 ते 3 या वेळेत होणाऱ्या मुख्य शासकीय महापूजेत हे वारकरी दांपत्य राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीसोबत थेट विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करतात. 

महापुजेचा बहुमान आणि सत्कार

Picture Credit: Pinterest

पूजेनंतर राज्य सरकार आणि मंदिर समितीच्या वतीने या वारकरी दांपत्याचा एसटी महामंडळाचा वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात येतो

पूजेनंतर सत्कार

Picture Credit: Pinterest

या परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य 

Picture Credit: Pinterest

हिंदू धर्मातील अनेक मोठ्या मंदिरामध्ये व्ही. आय. पी संस्कृती पाहायला मिळते. परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राजा आणि रंक एकाच पातळीवर उभे राहतात.

विठुरायाची पूजा

Picture Credit: Pinterest

राज्याचा मुख्यंत्री आणि शेतात राबणारा एक सामान्य वारकरी एकाच वेळी, एकाच पाटावर बसून विठुरायाची पूजा करतात.