Published Jan 29, 2025
By Mayur Na vle
Pic Credit - iStock
अनेक जण एखाद्या व्यक्तीवर एकतर्फी प्रेम करत असतात, जे त्यांनाच ठाऊक नसते. चला जाणून घेऊया, एकतर्फी प्रेम कसे ओळखायचे.
तुम्ही दिवस-रात्र त्या व्यक्तीचा विचार करत असता, पण त्यांना तुमच्या अस्तित्वाची फारशी जाणीव नसते.
संवाद, भेटी, किंवा मैत्री टिकवण्यासाठी तुम्हीच जास्त प्रयत्न करत असता, पण समोरचा फारसा उत्सुक नसतो.
ते तुमच्यासाठी सहज वेळ काढत नाहीत, पण तुम्ही त्यांच्या एका कॉलसाठीही तासनतास वाट पाहता.
समोरच्या व्यक्तीने सहज काही केले तरी तुम्ही त्याचा अर्थ "कदाचित त्यांनाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल" असा लावता.
तुम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम केलं तरी त्यांना त्याची फारशी जाणीव नसते किंवा त्यावर त्यांचा विशेष प्रतिसाद नसतो.
त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही तुमचे स्वभाव, कपडे, सवयी, आवडीनिवडी बदलण्याचा प्रयत्न करत असता.
प्रेम हे आनंददायी असते, पण जर तुमचे प्रेम अधिक वेदनादायक किंवातणावपूर्ण वाटत असेल, तर ते एकतर्फी असण्याची शक्यता आहे.