उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटी झाल्याने अनेक नागरिकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.
Img Source: Pinterest
उत्तरखंडमध्ये याआधी देखील केदारनाथ येथे झालेल्या ढगफुटीमध्ये हजारो भाविकांना जीव गमवावा लागला होता.
ढगफुटी म्हणजे काय ती कशी होते ते जाणून घेऊयात.
ढगफुटी म्हणजे एखाद्या ठिकाणी अतिरिक्त पाऊस पडणं.
या पावसामुळे अचानत पूर येणे आणि भूस्खलनासारखी दुर्घटना घडते.
समुद्र, नद्या, सरोवरे यांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ बनून आकाशात जाते.
ढगफुटी म्हणजे कमी वेळेत (सहसा एका तासात) जास्त प्रमाणात होणारा पाऊस.
जेव्हा ढगांमध्ये भरपूर पाणी जमा होतं आणि ते एकाच ठिकाणी कोसळतं तेव्हा ढगफुटी होते.
सध्या वातावरणात वाढलेली उष्णता, प्रदुषण यामुळे जमिनीचा पृष्ठभाग जास्त तापतो.
त्यामुळे एखाद्या ठराविक ठिकाणी खूप जास्त ढग जमा होतात आणि पाऊस जास्त होतो.