Published Nov 30, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
एकदा का उचकी यायला लागली की ती थांबायचं नाव घेत नाही.
शरीरातील डायाफ्रामच्या घर्षणामुळे उचकीची समस्या उद्भवते.
सतत उचकी येत असल्यामुळे आपल्याला त्याची चिड येऊ लागते.
अनेकदा पाणी पिणे हा उचकी थांबवण्याचा एक रामबाण उपाय मानला जातो.
अनेकदा प्रश्न पडतो की पाणी प्यायल्यामुळे उचकी कशी बंद होते. चला याबद्दल जाणून घेऊया.
थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील डायाफ्राममधील जळजळ कमी होते.
परंतु, प्रत्येक वेळी थंड पाणी प्यायल्याने उचकी थांबेल असे नाही.
.
थंड पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही दीर्घ श्वास घेऊन उचकीला थांबवू शकता.
.