Published Jan 08, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
केस कितीवेळा धुवावी हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की केसांचा प्रकार, स्काल्पची स्थिती, आणि बाहेरील वातावरण.
कोरड्या केसांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा केस धुणे पुरेसे असते. जास्त धुतल्याने केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते.
जर तुमचे केस तेलकट असतील तर आठवड्यातून 3-4 वेळा केस धुणे आवश्यक आहे, कारण तेलकटपणामुळे मुळांमध्ये घाण आणि चिकटपणा होतो.
नैसर्गिकरित्या संतुलित केसांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा धुणे योग्य असते.
दैनंदिन व्यायामामुळे किंवा घामामुळे डोक्याला चिकटपणा येतो. अशा वेळी 3-4 वेळा केस धुणे आवश्यक ठरते.
संवेदनशील त्वचेसाठी सौम्य शॅम्पू वापरून आठवड्यातून 2-3 वेळा केस धुण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात अधिक घाम येत असल्याने 3-4 वेळा केस धुणे उपयुक्त ठरते, तर थंडीत 2-3 वेळा धुणे पुरेसे असते.