Published Sept 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हेल्दी राहण्यासाठी रोज किती वॉक करावे?
निरोगी राहण्यासाठी रोज चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. रोज चालायला हवे असा सल्लाही मिळतो
वॉक केल्याने शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे मिळतात. दोन्ही आरोग्य चांगले राहते
चांगल्या फिटनेससाठी साधारण रोज 30 मिनिट्स ते 1 तास वॉक करणे आवश्यक आहे
.
जर किलोमीटर मोजायचे झाले तर 3-5 इतके किलोमीटर रोज चालण्याची शरीराला गरज आहे
.
चालण्यामुळे हार्ट हेल्थ सुधारते आणि मेटाबॉलिजम सुधारण्यासही मदत मिळते
कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशरवरदेखील रोज वॉक केल्याने नियंत्रण राहते आणि अटॅकचा धोका टळतो
रोज चालल्यामुळे तुम्हाला तणावातून सुटका मिळते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते
वॉक केल्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते ज्यामुळे वजन कमी होते
वॉक केल्याने केवळ आरोग्याचा दर्जा सुधारत नाही तर तुमचे आयुष्यही अधिक सुरळीत होते
आपल्या ट्रेनरच्या सल्ल्यानुसार वॉक करावे, आम्ही कोणताही दावा करत नाही