धनत्रयोदशीच्या दिवशी एकच दिवा देवघरात किंवा दरवाजाजवळ लावला जातो. हा दिवा "स्थिरलक्ष्मीचा दिवा" म्हणून ओळखला जातो.
Picture Credit: Pinterest
नरक चतुर्दशीच्या दिवशी दोन दिवे लावले जातात, एक यमराजासाठी आणि दुसरा घरातील सुख-शांतीसाठी.
Picture Credit: Pinterest
लक्ष्मीपूजेच्या दिवशी पाच दिवे शुभ मानले जातात. हे दिवे देवघर, दरवाजा, स्वयंपाकघर, तुळशीवृंदावन आणि अंगणात लावले जातात.
Picture Credit: Pinterest
या दिवशी सात दिवे लावणे शुभ मानले जाते. हे दिवे घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि अंगणात ठेवले जातात.
Picture Credit: Pinterest
भाऊबीजेच्या दिवशी नऊ दिवे लावले जातात, जे बहीण आणि भावामधील प्रेम, सौहार्द आणि रक्षणाचे प्रतीक असतात.
Picture Credit: Pinterest
पूर्ण दिवाळीच्या काळात ११, २१ किंवा ५१ दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आकडे धार्मिकदृष्ट्या पूर्णता आणि समृद्धीचे प्रतीक आहेत.
Picture Credit: Pinterest
दिवे पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि संपन्नता येते.
Picture Credit: Pinterest