Published Sept 30, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतीय रुपया हे भारताचे चलन आहे.
आपल्याला भारतात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय नोटांची गरज भासते.
भारतीय नोटांवर आपल्याला मोठ्या अक्षरात हिंदी आणि इंग्रजी भाषा पाहायला मिळते.
तुम्हाला माहीत आहे का भारतीय नोटांवर एकूण किती भाषा लिहील्या असतात.
भारतीय नोटांच्या मागील बाजूस 15 भाषा आहेत.
आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू
भारतात नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे.
रिझव्र्ह बँक, जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांप्रमाणेच, वेळोवेळी नोटांची रचना बदलत असते.
रिझव्र्ह बँकेने 1996 पासून महात्मा गांधी मालिकेतील नोटा सुरू केल्या आहेत.
भारतीय चलनात सध्या 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपयांच्या नोटा सक्रीय आहेत.