हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने तहान तशी कमीच लागते.
उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीत पाणी कमी प्यायलं जातं.
मात्र थंडी असो कि उन्हाळा शरीरात ठराविक प्रमाणात पाणी गेलंच पाहिजे.
सामान्यतः दिवसाला 2 ते 2.5 लीटर पाणी पिणं योग्य मानलं जातं.
पुरुषांना साधारण 2.5 ते 3 लीटर, तर महिलांना 2 ते 2.5 लीटर पाणी आवश्यक असतं.
हिवाळ्याच्या दिवसात सहसा वातावरण अतिरिक्त थंड असतं त्यामुळे कोमट पाणी प्यावं.
थंडीचे दिवस असले तरी सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास पाणी जरूर प्यावं.