कंडेन्स्ड मिल्कचा पोत घट्ट आणि मलईदार असतो, तर ते चवीला गोड असते. त्यातील ६०% पाणी काढून टाकण्यासाठी ते उकळले जाते किंवा वाळवले जाते, ज्यामुळे त्याला उत्तम पोत मिळतो.
Picture Credit: Pinterest
कंडेन्स्ड मिल्कचा सर्वांत जास्त मिठाईंना मलईदार गोडवा देण्यासाठी याचा वापर केला जातो. खीर, पुडिंग, आईस्क्रीम, केक आणि पेस्ट्री अशा सर्व पदार्थांमध्ये कंडेन्स्ड मिल्क घातले जाते.
Picture Credit: Pinterest
कंडेन्स्ड मिल्क दुधाने तयार केले जाते. त्यामुळे हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्कमध्ये 7.91 ग्रॅम प्रथिने असतात.
Picture Credit: Pinterest
100 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्कमध्ये 2.6 मिलिग्रॅम विटॅमीन सी असते. त्यात काही 'बी' जीवनसत्त्वे देखील अल्प प्रमाणात असतात. तसेच, हे 'ए' आणि 'डी' जीवनसत्त्वांचाही स्रोत आहे.
Picture Credit: Pinterest
कंडेन्स्ड मिल्कमध्ये कॅल्शिअम चांगल्या प्रमाणात असते. याव्यक्तिरिक्त यामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, जिंक, कॉपर आणि सेलेनियम सारखे प्रथिने असतात.
Picture Credit: Pinterest
कंडेन्स्ड मिल्कमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे.
Picture Credit: Pinterest
कंडेन्स्ड मिल्क बनवण्याची पद्धत वेगळी आहे. पण काही पदार्थांनी लवकर हे बनवू शकता. मिल्क पावडर, साखर, बटर आणि गरजेनुसार गरम पाणी टाकून कंडेन्स्ड मिल्क तयार होईल.
Picture Credit: Pinterest