Published Dec 25, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय डिश आहे.
शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी बिर्याणीचे विविध प्रकार देखील आहेत.
स्विगीने 2024 चा वार्षिक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये विविध खाद्य ट्रेंड्सचा उल्लेख केला आहे.
गेल्या वर्षी प्रमाणे, या वर्षी देखील बिर्याणी सर्वात लोकप्रिय डिश ठरली आहे.
स्विगीकडून लोकांनी 2024 मध्ये 83 दशलक्ष बिर्याणी ऑर्डर केल्या.
देशात प्रति मिनिट 158 बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या.
2024 मध्ये चिकन बिर्याणी ही स्विगीवरील सर्वात आवडती डिश ठरली आहे.
2024 मध्ये 9.7 दशलक्ष बिर्याणी ऑर्डर देऊन हैदराबाद "बिर्याणी लीडरबोर्ड" मध्ये अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर बंगळुरू (7.7 दशलक्ष ऑर्डर) आणि चेन्नई (4.6 दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.
रमझान 2024 मध्ये भारतातील प्लॅटफॉर्मद्वारे बिर्याणीच्या सुमारे 6 दशलक्ष प्लेट्सची ऑर्डर देण्यात आली होती.