Published Sept 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दिवसातून नेमकं किती वेळ भात खावा?
भाताशिवाय कितीतरी जणांना आपण जेवण जेवलोय असं वाटतंच नाही. पण वजन वाढण्याचीही भीती असते
डाएटमध्ये भात हवा की नको यावरूनही अनेकदा वाद होतात. पण डाएटमध्ये भात कसा खावा हेदेखील सांगतात
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भात खाल्ल्याने वजन वाढते, तर काही जण म्हणतात असे अजिबात नाही
.
मात्र भात खावा की खाऊ नये याबाबत नक्की खरं काय आहे? किती भात खावा हे जाणून घेऊया
.
दिवसातून एक वा दोनवेळा भात खाणं हे शरीरासाठी योग्य ठरते. प्रमाणात भात खाणे गरजेचे आहे
भात किती आणि कोणत्या दर्जाचा खातोय यावर वजनवाढ होते की नाही हे ठरते
वेट लॉस करत असाल तरीही तुम्ही दिवसातून डाएटिशिनने दिलेल्या प्रमाणात 2 वेळा नक्कीच भात खाऊ शकता
व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईस खाणं हा एक चांगला पर्याय आहे असंही सांगण्यात येतं
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही