Published Feb 09, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीला व्हॅलेंटाईन वीक म्हंटले जाते.
९ फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते.
२०२३ मध्ये देशातील चॉकलेटचा बाजार २२,८२५ कोटी रुपये इतका होता.
देशात चॉकलेटचा बाजार वाढत असल्याने २०३२ पर्यंत यात ४६,५२५ कोटी इतका होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेटच्या मागणीत वाढ होते. दरम्यान, या दिवसांत ५० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंतचे चॉकलेट विकले जातात.
चॉकलेटला प्रेमाचे प्रतीक मानले तरी चुकीचे नाही. नात्यात गोडवा भरण्यासाठी चॉकलेट फार उपयोगी ठरते.