Published Sept 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कोणत्या डाळीत किती प्रोटीन
प्रोटीनचा सर्वाधिक सोर्स हा डाळीच असतात, ज्या अगदी कोणत्याही दुकानात सहज प्राप्त होतात
पण कोणत्या डाळीत किती प्रोटीन आहे याबाबत तुम्हाला माहीत आहे का?
घरातील डाळीत नक्की किती प्रोटीन असते याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे डाएटनुसाल तुम्ही सेट करावे
.
आमटी आणि अन्य डाळींसह ही खाल्ली जाते. 100 ग्रॅम उकडलेल्या मुगडाळीत 24 ग्रॅम प्रोटीन आढळते
.
भाजीमध्येही ही डाळ वापरली जाते. 100 ग्रॅम चणाडाळीमध्ये साधारण 22 ग्रॅम इतके प्रोटीन असते
ही डाळ सर्वात लवकर शिजते आणि 100 ग्रॅम उकडलेल्या मसूर डाळीत 26 ग्रॅम प्रोटीन आढळते
या डाळीला अरहर डाळ असंही म्हणतात. 100 ग्रॅम उकडलेल्या तूरडाळीत 22 ग्रॅम प्रोटीनचे प्रमाण असते
उत्तर भारतात राजमा खूपच जास्त प्रमाणात खाल्ला जातो. 100 ग्रॅम उकडलेल्या राजमामध्ये 9 ग्रॅम प्रोटीन आढळते
अख्खा उडीद, उडीद डाळ असे अनेक प्रकार असून 100 ग्रॅम उकडलेल्या उडीद डाळीत 24 ग्रॅम प्रोटीन मिळते
काबुली चणे अर्थात छोले हे सलाड वा भाजी स्वरूपात खाल्ले जात असून 100 ग्रॅम उकडलेल्या काबुली चण्यात 19 ग्रॅम प्रोटीन असते
साधारण सर्व उकडलेल्या डाळींमध्ये 20 - 25 ग्रॅम इतके प्रोटीन आढळत असून आरोग्यासाठी उत्तम ठरते