Published Oct 16, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आपल्या दैनंदिन आहारात साखरेचे खूप महत्त्व आहे. तसेच साखर ऊर्जेचे मुख्य स्त्रोत मानले जाते.
WHO च्या म्हणण्यानुसार, सर्व प्रौढांनी त्यांच्या एकूण कॅलरीजपैकी 10% पेक्षा जास्त साखर एका दिवसात खाऊ नये
सोप्या भाषेत समजायचे झाले तर एका दिवसात 25 ते 50 ग्राम साखरच खाल्ली पाहिजे.
आपण सर्वांनीच एका दिवसात 5 ते 10 चामच्यांपेक्षा साखर नाही खाल्ली पाहिजे.
तर लहान मुलांनी 25 ग्रामपेक्षा जास्त साखर खाऊ नये.
साखरेचे अतिसेवन डायबिटीस, लठ्ठपणा आणि अशा अनेक आजारांना आमंत्रित करू शकते
फळांपासून आपल्याला नैसर्गिक साखर मिळते तर रिफाईंड साखर आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकते.
कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण अधिक जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.