Published Feb 12, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आपल्या उत्तम आरोग्यासाठी व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. त्यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन बी12
शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. हा व्हिटॅमिन DNA निर्मिती आणि नर्व्हस सिस्टम नीट काम करण्यासाठी महत्वाच आहे.
व्हिटॅमिन बी12 ची दैनंदिन गरज व्यक्तीच्या वय आणि आरोग्य स्थितीवर निर्भर असते.
एक्सपर्टस म्हणतात की व्हिटॅमिन बी12 ची दैनंदिन गरज 2.4 मायक्रोग्राम एवढी असते.
जर एखाद्या व्यक्तीचे वजन 50 किलो असेल तर त्याला 1.8 mcg आणि 70 किलो वजन असणाऱ्यांसाठी 2.4 mcg व्हिटॅमिन बी12 लागते.
जर तुमच्या शरीरात कमी व्हिटॅमिन बी12 असेल तर मग डॉक्टरांना तुम्हाला यासाठी टॅब्लेट लिहून देऊ शकतात.
शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दूध,दही, पनीर, सोयाबीन, मूग डाळ आणि अंडी खाऊ शकतात.