Published Sept 7, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मासिक पाळीत किती वेळा पॅड्स बदलावे
मासिक पाळी महिन्यातून 4 दिवस प्रत्येक मुलीला वा महिलेला ठराविक वयापर्यंत येतेच
मासिक पाळीच्या दिवसात हायजीन सांभाळण्याचा सल्ला लहानपणापासून दिला जातो
.
मासिक पाळीत वापरण्यात येणारे पॅड्स बदलण्याचा सल्ला डॉक्टरही देतात, पण साधारण किती वेळा हे माहीत आहे का?
.
गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आस्था दयाल यांनी सॅनिटरी पॅड्स बदलण्याची योग्य वेळ सांगितली
दिवसातून साधारण 4-6 तासात पॅड्स बदलावे. हेव्ही ब्लिडिंग नसेल तरीही 6 पेक्षा अधिक तास एकच पॅड ठेऊ नये
अधिक काळ एकच पॅड वापरल्याने प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येते आणि त्रासदायक ठरते
स्किनवर रॅश येऊन त्याठिकाणी प्रायव्हेट पार्टजवळ चकते दिसतात आणि त्यावर अधिक खाज येते
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात UTI ची समस्या पॅड न बदलल्याने होऊ शकते
याशिवाय त्वचेत जळजळ होऊन दुर्गंधी येण्याची अधिक शक्यता असते आणि त्वचा खराबही होते