Published July 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Pinterest
हनुमानाचे नक्की वय किती?
धार्मिक आणि पुराणातील मान्यतेनुसार, भगवान हनुमान हे अमर असून चिरंजीवी असल्याचे म्हटले जाते
आजही आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी हनुमानजी येतात आणि रक्षा करतात अशी मान्यता आहे
हनुमानाला श्रीरामाने वरदान दिले होते की, जोपर्यंत रामाचे नाव राहील तोपर्यंत हनुमान जिवंत राहील
.
आजही हनुमानाच्या महान शक्ती अस्तित्वात असल्याचे मानण्यात येते आणि अनेकांना याचा अनुभव आल्याचे सांगण्यात येते
.
पुरणानुसार हनुमानाचा जन्म हा त्रेतायुगात झाला होता आणि त्यानंतर द्वापर युग झाले आणि आता कलियुग चालू आहे
हनुमान अमर असल्याने त्यांच्या वयाची कोणतीही सीमा नाहीये. पण काही हिंदू ग्रंथानुसार त्यांचे वय एक कल्प अर्थात 4.32 अरब वर्ष आहे
सध्या भगवान हनुमान गंधमादन पर्वतावर, जे कैलास पर्वताजवळ आहे तिथे राहतात असे मानले जाते
भगवान हनुमान सध्या विशेषतः टिब्बा आणि केदारनाथजवळच्या गुफांमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते
आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी रूप बदलून हनुमानजी दर्शन देतात अशीही मान्यता आहे
ही माहिती धार्मिक मान्यतांप्रमाणे देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही