Published Feb 09, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
रात्रभर जागणारा पक्षी म्हणून घुबडाची ओळख आहे. घुबडांना आळशीही मानली जाते.
अनेकदा घुबडांना मूर्ख म्हंटले जाते पण असं मुळीच नसतं. त्यांची जगण्याची शैली जरा इतर पक्ष्याहून अलग असते.
घुबड एकमेकांशी संवाद साधताना हुटींग करतात. याच्या किंचाळण्यातही भिन्नता जाणवते.
वैज्ञानिक सांगतात कि घुबडाच्या किंचाळण्यातही निरनिराळे पॅटर्न असतात.
जेव्हा नर घुबड मादा घुबडाला आकर्षित करतो त्यावेळी त्याच्या किंचाळण्यातील स्वर अतिशय सॉफ्ट होऊन जातात.
संदेशाप्रमाणे आवाज असतो. आवाजाच्या पॅटर्नने समोरील घुबड अंदाज बांधतो कि "याला नक्की म्हणायचं काय आहे?"
घुबडाच्या अनेक प्रजाती आहेत आणि प्रत्येकाचा आवाज भिन्न आहे. काहींचा आवाज पातळ आहे तर काहींचा अतिशय कर्कश.