घरच्या घरी अशा प्रकारे तपासा दूध शुद्ध आहे की बनावट

Lifestyle

23 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दुधाची तपासणी

दुधाचा थेंब काचेवर किंवा फरशीवर तिरपा करून सोडल्यास, शुद्ध दूध हळूहळू वाहते आणि पांढरा पट्टा मागे सोडते, तर भेसळयुक्त दूध वेगाने वाहून जाते. दूध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्याच्या काही प्रमुख घरगुती पद्धतीने जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

काचेच्या गुळगुळीत पृष्ठभागावर (स्लाईडवर) किंवा ताटलीवर दुधाचा एक थेंब तिरपा करून सोडा. शुद्ध दूध हळूहळू खाली वाहते आणि मागे एक पांढरा पट्टा किंवा डाग सोडते. 

पाण्याची चाचणी 

Picture Credit: Pinterest

पाणी मिसळलेले दूध

अतिशय वेगाने खाली वाहून जाते आणि कोणताही डाग मागे उरत नाही.

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात ५ मिलीलीटर दूध घेऊन ते उकळा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात २-३ थेंब आयोडीन टिंचर टाका. जर मिश्रणाचा रंग निळा झाला, तर दुधात स्टार्च किंवा पिठाची भेसळ आहे.जर रंगात कोणताही बदल झाला नाही, तर दूध शुद्ध आहे.

स्टार्च (पिठाची) चाचणी

Picture Credit: Pinterest

एका छोट्या बाटलीत किंवा काचेच्या ग्लासात ५ ते १० मिलीलीटर दूध आणि तेवढेच पाणी एकत्र करा. हे मिश्रण चांगले जोरात हलवून फेस तयार करा. जर फेस खूप जास्त वेळ तसाच राहिला आणि बाटलीवर साबणासारखा किंवा डिटर्जंटचा थर जमा झाला, तर दुधात डिटर्जंटची भेसळ आहे.

डिटर्जंटची चाचणी

Picture Credit: Pinterest

युरियाची चाचणी

Picture Credit: Pinterest

एका टेस्ट ट्यूब किंवा काचेच्या ग्लासात १ चमचा दूध आणि १ चमचा सोयाबीन पावडर किंवा हरभरा डाळीचे पीठ एकत्र करून ५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर त्यात लाल लिटमस पेपर बुडवा. जर लिटमस पेपरचा रंग निळा झाला, तर दुधात युरिया मिसळलेला आहे.

हातावर घासून पाहणे 

Picture Credit: Pinterest

दूधाचे काही थेंब हातावर घेऊन ते दोन्ही हात एकमेकांवर काही सेकंद चोळा. जर हात तेलकट किंवा साबणासारखे गुळगुळीत वाटले, तर दुधात कृत्रिम घटकांची भेसळ आहे. शुद्ध दूध हातावर चोळल्यास असा कोणताही तेलकटपणा जाणवत नाही.