Published Oct 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
सोप्या टिप्सने करा 5 मिनिट्समध्ये जळलेली कढई साफ
जेवण बनवताना कढईचा जास्त उपयोग केला जातो. पण कधीतरी लक्ष चुकले की कढई जळून काळी पडते
कढईतील जेवण त्याला चिकटते आणि करपते, त्यानंतर कढई साफ करणे म्हणजे एक डोक्याला ताप होतो
आम्ही आज तुम्हाला काही सिंपल क्लिनिंग हॅक्स सांगणार आहोत, ज्यामुळे जळलेली कढई त्वरीत स्वच्छ होईल
.
जळलेल्या कढईचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. गरम पाणी, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करून कढई स्वच्छ करा
.
लिंबू आणि मीठ मिक्स करून जळलेली कढई घासल्यास त्रास होणार नाही आणि मिनिट्समध्ये स्वच्छ होईल
स्क्रबरवर व्हाईट व्हिनेगर घ्या आणि जळलेली कढई घासा. पटकन स्वच्छ करण्यास मदत मिळते
तुम्ही कपड्यांना वापरणारी डिटर्जंट पावडर वापरूनही जळलेली कढई लवकर साफ करू शकता
लवकरात लवकर आणि कमी कष्टात या गोष्टींचा वापर करून कढई पटकन साफ करता येते