Published Dev 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दोन वेळा ब्रश करूनही अनेकदा तोंडातून दुर्गंधी येते आणि आपल्याला शरमेने मान खाली घालायला लागते
केवळ ब्रश न केल्याने दुर्गंधी येत नाही तर त्याची अनेक कारणे आहेत. पचन आणि बॅक्टेरिया हेदेखील कारण आहे
रोज दात आणि जीभ योग्य पद्धतीने स्वच्छ करणे गरजेचे आहे, जेणेकरून बॅक्टेरिया राहणार नाहीत
जेवल्यानंतर पाणी न पिण्याने दुर्गंधी वाढते. पाणी पिण्याने तोंडातील ताजेपणा राहतो आणि बॅक्टेरिया नष्ट होतो
मोहरीच्या तेलात मीठ मिक्स करून हलक्या हाताने मसाज करा, यामुळे तोंडात दुर्गंधी येणार नाही
तुळशीची पानं चावल्याने तोंडाला दुर्गंधी येत नाही आणि घावही लवकर भरतात
.
तोंडाला एखादा घाव वा इन्फेक्शन असल्यास तुळशीच्या पानांचे सेवन करणे उपयुक्त ठरते
.
धुम्रपान, लसूण, कांद्याचे सेवन यामुळेही तोंडातून दुर्गंधी येते, हे खाण्यापासून दूर राहा
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.