डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

Life style

09 December, 2025

Author:  नुपूर भगत

काकडीचे थंड स्लाइस डोळ्यांवर १०–१५ मिनिटे ठेवा. यामुळे त्वचेची सूज कमी होते आणि काळसरपणा हलका होतो.

थंड काकडीचे स्लाइस

Picture Credit: Pinterest

कच्च्या बटाट्याचा रस कापसाने डोळ्याखाली लावा. त्यातील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म डार्क सर्कल कमी करण्यात मदत करतात.

 बटाट्याचा रस

Picture Credit: Pinterest

कापूस थंड दुधात भिजवून डोळ्याखाली १० मिनिटे ठेवा. दुधातील लॅक्टिक ॲसिड त्वचा उजळ करते आणि त्वचेला शांत करते.

मसाला मिक्स करणे

Picture Credit: Pinterest

अ‍ॅलोवेरा जेल हलक्या हाताने २–३ मिनिटे लावा. हे डोळ्याखालची त्वचा मॉइश्चराइज करून चमक वाढवते.

अ‍ॅलोवेरा जेल मसाज

Picture Credit: Pinterest

एक चिमूट हळद आणि एक चमचा मध मिक्स करून डोळ्याखाली लावा, १० मिनिटांनी धुवा. हे डार्कनेस कमी करतात.

हळद आणि मध पॅक

Picture Credit: Pinterest

थंड ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बॅग डोळ्यांवर ठेवा. टीतील टॅनिन्स त्वचा घट्ट करत सूज व काळेपणा कमी करतात.

टी-बॅग थेरपी

Picture Credit: Pinterest

दररोज ७–८ तास झोप आणि दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे. हे त्वचा नैसर्गिकरित्या उजळ ठेवते.

झोप आणि हायड्रेशन

Picture Credit: Pinterest