Published Oct 05, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
स्वयंपाकघरात या भांड्यात ठेवा पाणी, राहूच्या वाईट प्रभावातून मिळेल मुक्ती
घरात सुख शांतता नांदावी यासाठी अनेक वास्तुशास्त्रानुसार उपाय केले जातात. राहू दोषातून मुक्तता कशी मिळेल
किचनमध्ये तुम्ही तांब्याचे भांडे ठेवल्यास राहू दोषापासून मुक्तता मिळते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे
मान्यतेनुसार घरातील स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचा वास असतो आणि त्यामुळे ही जागा पवित्र असते
.
घरात किचनमध्ये तांब्याची भांडी ठेवल्यास ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळते असे सांगण्यात येते
.
किचनच्या स्लॅबर पाणी ठेवल्याने अग्नि तत्वाचा प्रभाव संतुलित राहतो
वास्तुशास्त्रानुसार अग्नि तत्वाजवळ पाणी ठेवणे चांगले लक्षण आहे
किचनच्या स्लॅबवर पाणी ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडत नाही आणि राहूचा हानिकारक प्रभाव पडत नाही
त्यामुळेच नियमित किचनमध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो
ही माहिती वास्तुशास्त्रानुसार देण्यात आली आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही