Published August 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लसणाच्या तुकड्याने उंदरांना काढा घराबाहेर
घरात उंदीर येणे आणि त्रास देणे हे अत्यंत कॉमन आहे. पण या उंदरांना बाहेर काढण्यासाठी काय करावे?
लसूण खाण्यात स्वाद वाढवते. पण उंदरांसाठी लसूण त्रासदायक ठरते. याच्या वासाने उंदीर सैरावैरा पळतात
.
लसणाच्या पाकळ्या मुख्य प्रवेशद्वाराशी ठेवल्याने उंदराचा घरात प्रवेश होत नाही
घरात उंदीर येण्याची शक्यता असणाऱ्या जागांच्या अवतीभवती लसणाच्या पाकळ्या पसरवा
लसणाचा वास उंदरांना आवडत नाही. लसूण पाण्यात मिक्स करून स्प्रे तयार करा आणि घरात मारा
लसणाचे तुकडे करून घरात विविध ठिकाणी पसरवा. कोपऱ्यामध्ये ठेवल्याने उंदीर येणार नाहीत
लसणाचे हे उपाय केल्याने उंदीर घरापासून दूर पळतील आणि न मारता तुम्ही उंदरांपासून सुटका मिळवाल
सोपे घरगुती उपाय वापरून उंदरांचा करा नायनाट