Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केळं पिकवण्यासाठी कार्बाइड रसायनाचा वापर केला जातो. जे शरीरासाठी हानिकारक असते
केळ्याचं साल गुळगुळीत आणि हलकं पिवळं असेल तर कार्बाइडने पिकवलेलं असेल
नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्याचा रंग गडद पिवळा असतो आणि त्यावर काळे डाग असतात
केळं एकदम पिवळं धम्मक आणि टवटवीत असेल तर पिकवलेलं केळं, नैसर्गिक केळी थोडी निस्तेज दिसतात
केळं पाण्यात टाकावे, पाण्यात बुडल्यास खरं केळं आणि तरंगल्यास नकली केळं
काही ठिकाणी कच्ची आणि काही जास्त पिकलेली असतील तर ती नकली केळी, नैसर्गिक केळी समसमान पिकतात
केळी बाहेरून पिकलेलं असलं तरी हात लावल्यावर टणक लागते, नैसर्गिक केळं मऊ असते