उन्हाळ्यात बाईकचे इंजिन कसे कूल ठेवावे? 

Automobile

20 February 2026

Author:  मयुर नवले

उन्हाळा सुरु झाला आहे. या मोसमात बाईकची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 

उन्हाळा 

Picture Credit: Pinterest

यातही बाईकच्या इंजिनवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

इंजिनवर लक्ष द्या 

तुम्ही उन्हाळयात बाईकचे इंजिन कसे कूल ठेवता येईल, त्याबद्दल जाणून घेऊयात. 

इंजिन कूल कसे राहील?

उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याने इंजिन ऑइल पटकन खराब होते. योग्य ग्रेडचे आणि कंपनीने सुचवलेले ऑइल वापरा.

इंजिन ऑइल वेळेवर बदला

धुळीमुळे एअर फिल्टर ब्लॉक झाल्यास इंजिनला योग्य हवा मिळत नाही आणि तापमान वाढते. त्यामुळे फिल्टर साफ किंवा बदलून घ्या.

एअर फिल्टर स्वच्छ ठेवा

सिग्नल किंवा लांब ट्रॅफिकमध्ये अनावश्यक आयडलिंग टाळा. शक्य असल्यास इंजिन बंद करा.

ट्रॅफिकमध्ये इंजिन बंद ठेवा

बाईक सावलीत किंवा कव्हर वापरून पार्क करा. थेट उन्हात ठेवल्यास इंजिन आणि इतर पार्ट्स गरम होतात.=

थेट उन्हात पार्किंग टाळा

चेन कोरडी असल्यास इंजिनवर जास्त लोड येतो. नियमित ल्युब्रिकेशन केल्याने स्मूथ रनिंग होते.

चेन ल्युब्रिकेशन करा