हल्ली प्रत्येक दुकानात आपल्याला क्यूआर कोड दिसते.
Image Source: Pinterest
तसेच फोन पे, गूगल पे सारख्या ॲपच्या सहाय्याने आपण ऑनलाइन पेमेंट करत असतो.
मात्र, काही ठिकाणी बनावट क्यूआर कोड देखील लावले जातात.
बनावट क्यूआर कोड स्कॅन केल्याने तुमचा बँक बॅलन्स रिकामा होऊ शकतो.
पेमेंट केल्यानंतर दुकानातील साउंड बॉक्सच्या आवाजाकडे लक्ष द्या.
जर त्या साउंड बॉक्समधून आवाज आला नाही तर सावधान रहा.
बनावट क्यूआर कोड ओळखण्यासाठी गूगल लेन्सने ते क्यूआर कोड स्कॅन करा.
यासोबतच पेमेंट करता दुकानाच्या मालकाचे नाव तपासा. चुकीचे नाव आल्यास ऑनलाईन पेमेंट टाळा.