Published Jan 30, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
असे अनेकदा होते की आपण जीमेलचा पासवर्ड विसरून जातो.
अनेक लोकांना जीमेल पासवर्ड विसरल्यास त्याला रिकव्हर कसे करावे याबाबत जास्त माहिती नसते.
आज आपण अशा काही महत्वाच्या स्टेप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट रिकव्हार करू शकता.
जीमेल लॉगिन पेजवर जा आणि तुमचा ईमेल अॅड्रेस सबमिट करा व नेक्स्टवर क्लिक करा. आता पासवर्ड बॉक्सच्या खाली असलेल्या Forgot password वर क्लिक करा.
तुम्ही 'फॉरगॉट पासवर्ड' वर क्लिक करताच, गुगल तुमची ओळख पडताळण्यासाठी तुमच्या रिकव्हरी ईमेल किंवा मोबाइल नंबरवर एक व्हेरिफाय कोड पाठवेल.
तुमची ओळख पडताळण्यासाठी, स्क्रीनवर मिळालेला कोड एंटर करा.
कोड टाकल्यानंतर, तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार करावा लागेल. हा पासवर्ड किमान ८ अक्षरांचा अल्फान्यूमेरिक असावा.
पासवर्ड तयार केल्यानंतर, तो कन्फर्म करा आणि नंतर सेव्ह करा. तुमचा नवीन पासवर्ड तयार झाला आहे. आता तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन करू शकता.