बदाम दूध बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Lifestyle

19 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

बदामातील पोषक तत्व

बदामामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शिअम, आयरन, पोटॅशिअम, जिंक, कॉपर, मॅग्नेशिअम यांसारखे पोषख तत्व असतात.

Picture Credit: Pinterest

बदामाचे दूध हे दुधाला एक उत्तम वनस्पती-आधारित पर्याय आहे, जे तुम्हाला चांगले फॅट्स आणि प्रथिनांसहित भरपूर पोषण पुरवते.

सर्वोत्त्म पदार्थ

Picture Credit: Pinterest

सर्वांत पहिले बदाम स्वच्छ धुवून घ्या नंतर रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. जेणेकरून ते व्यवस्थित फुगते आणि साल काढणे सोपे होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते उकळून घेऊ शकता.

बदाम भिजवून घ्या

Picture Credit: Pinterest

साले काढा

सकाळी बदाम पाण्यातून काढून घ्या आणि सालं काढा. कारण यांच्या सालामध्ये टॅनिन असते. जे शरीरातील विटॅमीन ई आणि मॅग्नेशिअमला शोषून घेते

Picture Credit: Pinterest

बदामाची साल काढल्यानंतर थोडं पाणी टाकून  मिक्सरमधून बारीक करून घ्या. अशा प्रकारे त्याची घट्ट पेस्ट बनेल.

बदाम बारीक करा

Picture Credit: Pinterest

बदाम बारीक करून झाल्यानंतर एका पातेल्यात मलमलचे कापड घेऊन त्यातून चांगले गाळून घ्या. तुमचे बदामाचे दूध तयार आहे.

दूध गाळण्याची प्रक्रिया

Picture Credit: Pinterest

बदामाच्या दुधाचा असा करा वापर

Picture Credit: Pinterest

बदामाच्या दुधाला तुम्ही चहा कॉफीमध्ये वापरू शकता किंवा मिल्क शेक बनवू शकता. तुम्ही ते ओट्स, कॉर्नफ्लेक्स आणि मुसलीमध्ये मिसळून नाश्त्यात खाऊ शकता.