गाजर स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. नंतर स्लायसर किंवा तीक्ष्ण सुरीने अगदी बारीक आणि लांब काप करा.
Picture Credit: Pinterest
कापलेले गाजर टिश्यू पेपरवर ठेवा आणि त्यातील ओलावा पूर्णपणे पुसून घ्या. यामुळे चिप्स अधिक कुरकुरीत बनतात.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात गाजराचे काप घ्या. त्यात तेल, मीठ, काळीमिरी पूड आणि तिखट टाका आणि मिसळा.
Picture Credit: Pinterest
बेकिंग ट्रेवर बटर पेपरवर लावा. त्यावर गाजराचे काप एकसारखे पसरवा. एकमेकांवर ठेवू नका.
Picture Credit: Pinterest
ओव्हन १८०°C वर गरम करा आणि गाजर चिप्स १५ ते २० मिनिटे दोन्ही बाजूंनी बेक करा.
Picture Credit: Pinterest
बेक झाल्यावर ट्रे बाहेर काढा आणि चिप्स काही मिनिटे थंड होऊ द्या. थंड झाल्यावरच ते अधिक खुसखुशीत होतील.
Picture Credit: Pinterest
गाजर चिप्स पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात ठेवा. हे ४–५ दिवस ताजे राहतात.
Picture Credit: Pinterest