दुधी भोपळा स्वच्छ धुवून सोलून किसून घ्या. पाणी पिळून काढू नका, कारण ते थालीपीठ मळताना उपयोगी पडते.
Picture Credit: Pinterest
मोठ्या भांड्यात किसलेली दुधी, कांदा, मिरच्या, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ टाका.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात बेसन, ज्वारी आणि गव्हाचे पीठ घालून थोडेथोडे पाणी घालत मऊसर पीठ मळा.
Picture Credit: Pinterest
एका प्लास्टिक शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडे तेल लावून हाताने थालीपीठ थापून घ्या.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा आणि थापलेले थालीपीठ अलगद तव्यावर ठेवा.
Picture Credit: Pinterest
दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून सोनेरी तपकिरी होईपर्यंत शेकून घ्या.
Picture Credit: Pinterest
दुधी थालीपीठ गरमागरम दही, लोणी किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest