सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय म्हणजे घरगुती काढा 

Life style

04 December, 2025

Author:  नुपूर भगत

एका खोलगट पातेल्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवा.

भांडे गरम करा

Picture Credit: Pinterest

पाणी कोमट झाल्यावर त्यात ठेचलेले आले घालून उकळी येऊ द्या.

आले घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात तुळशीची पाने आणि ठेचलेल्या काळ्या मिरीचे दाणे घाला.

तुळस-काळी मिरी घाला

Picture Credit: Pinterest

दालचिनीचा छोटा तुकडा आणि अर्धा चमचा हळद टाका.

दालचिनी-हळद मिसळा

Picture Credit: Pinterest

मिश्रण ५–७ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, जेणेकरून सर्व घटकांचे गुणधर्म पाण्यात उतरेल.

काढा आटू द्या

Picture Credit: Pinterest

काढा गाळून घ्या आणि गुळ किंवा मध घालून हलक्या हाताने ढवळा. (मध वापरत असाल तर काढा कोमट झाल्यावरच घाला.)

गाळून गोडवा द्या

Picture Credit: Pinterest

काढा गरमागरम प्या. दिवसातून 1–2 वेळा घेतल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.

गरमागरम प्या

Picture Credit: Pinterest