अंडा राईसची टेस्टी रेसिपी! 

Life style

16 october 2026

Author:  नुपूर भगत

शिळा भात फ्रिजमध्ये ठेवलेला असल्यास तो बाहेर काढून त्यातील गुठळ्या हलक्या हाताने मोकळ्या करा. भात व्यवस्थित थंड आणि दाणेदार असावा.

भात तयार करा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात दोन अंडी फोडून त्यात थोडे मीठ घाला आणि चमच्याने किंवा काट्याने चांगले फेटून घ्या.

अंडी फेटून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून फेटलेली अंडी घाला. अंडी हलवत राहा आणि पूर्णपणे शिजल्यावर ती एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

अंडी शिजवा

Picture Credit: Pinterest

त्याच कढईत थोडे तेल घालून कांदा, हिरवी मिरची आणि चिरलेल्या भाज्या घाला. भाज्या थोड्या कुरकुरीत राहतील इतपत परतून घ्या.

भाज्या परतून घ्या

Picture Credit: Pinterest

भाज्यांमध्ये सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळा.

मसाले आणि सॉस घाला

Picture Credit: Pinterest

आता कढईत शिजवलेला भात आणि तयार केलेली अंडी घाला. सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे परता.

भात आणि अंडी मिसळा

Picture Credit: Pinterest

तयार अंडा राईसवर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा स्प्रिंग अनियन घाला. गरमागरम अंडा राईस टोमॅटो सॉस किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

गरमागरम सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest