हलवाईसारखी गोडसर बालुशाही घरीच तयार करा

Life style

22 October, 2025

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा आणि तूप घालून मिक्स करा, नंतर त्यात दही घालून मऊ पण घट्ट पीठ मळा आणि ३० मिनिटे झाकून ठेवा.

 पीठ मळणे

Picture Credit: Pinterest

पीठाच्या लहान लहान गोळ्या करून त्यांच्या मधोमध थोडा दाब द्या. गोल आकाराच्या आणि मध्ये थोडी खोलगट जागा तयार करा.

 गोळे बनवणे

Picture Credit: Pinterest

कढईत तूप किंवा तेल गरम करा, पण जास्त तापवू नका. बलुशाही मंद आचेवरच तळायची असते.

 तळण्यासाठी तयारी

Picture Credit: Pinterest

गरम तुपात बालुशाही घालून कमी आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. नंतर ती बाहेर काढून किचन टॉवेलवर ठेवा.

बालुशाही तळा

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून पाक तयार करा. पाक एकतारी झाला की गॅस बंद करा.

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

गरम बलुशाही तयार पाकात बुडवून ५-७ मिनिटे तसेच ठेवा म्हणजे साखर व्यवस्थित शोषली जाईल.

बालुशाही पाकात बुडवणे

Picture Credit: Pinterest

साखर शोषल्यानंतर बलुशाहीवर चिरलेले बदाम-पिस्ते टाका आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest