Published August 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आरोग्य आणि स्वाद दोन्हीमध्ये उत्तम ‘हेल्दी डोसा’
नाचणीचा डोसा हा नाश्त्यामध्ये बनवणे सोपे असून आरोग्यवर्धक आहे
1 कप नाचणीच्या पिठात अर्धा कप तांदळाचे पीठ, अर्धा कप रवा आणि मीठ मिक्स करा
.
या मिश्रणात तुम्ही 1 कप दही मिक्स करून पातळसर मिश्रण तयार करून घ्या
हे तयार झालेले मिश्रण साधारणतः अर्धा तास सेट होऊ द्या
त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर मिक्स करून घ्या
गॅसवर तवा ठेऊन त्यावर तयार केलेले बॅटर नेहमीच्या डोशाप्रमाणे पसरवा
डोसा होत आल्यावर किनाऱ्यावर तेल वा तूप अथवा बटर सोडा आणि शिजू द्या
डोसा तयार झाल्यावर सांभर आणि नारळाच्या चटणीसह गरमागरम खायला द्या