Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - pexels
किमची ही एक स्वादिष्ट आणि फर्मेंटेड कोरियन डिश आहे, जी भारतीयांना खूप आवडते
गाजर, कोबी, कांदा, लसूण, कोरियन लाल मिरची पावडर, सोडियम व्हाइट सॉस, साखर, एप्पल व्हिनेगर, मीठ
सगळ्यात आधी कोबी स्वच्छ धुवून चिरून घ्या, 2 ते 4 तास मीठाच्या पाण्यात ठेवा
एका बाउलमध्ये कोरियन मिरची पावडर, लसूण, आलं, साखर, सोडियम व्हाइस सॉस, व्हिनेगर घालून मिक्स करा
गाजर किसून घ्या, कांदा बारीक चिरून घ्या, आणि दोन्ही मसाल्यामध्ये मिक्स करा
त्यानंतर कोबी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी, आणि मसाल्यामध्ये मिक्स करा
एअरटाइट डब्यात 2 ते 3 दिवस भरून फर्मेंटेशन व्हायला ठेवून द्या
साधारण 2 ते 3 दिवसांनंतर व्हेजिटेरियन किमची तयार आहे, ही 1 ते 2 आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता