काजूकतलीची सोपी अन् चविष्ट रेसिपी

Life style

16 October, 2025

Author:  नुपूर भगत

काजू कोरडे करून मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. जास्त वेळ फिरवू नका, नाहीतर तेल सुटेल.

 काजू तयार करणे

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून दोन धाग्यांचा पाक बनवा. मध्यम आचेवर हलवत राहा.

 पाक तयार करणे

Picture Credit: Pinterest

पाकात काजू पावडर टाका आणि गाठी न होऊ देता छान हलवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

काजू पावडर 

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या. मग हाताने किंवा स्पॅचुलाने मऊसर मळा.

 मिश्रण मळणे

Picture Credit: Pinterest

थोडं तूप हाताला लावून मिश्रण एकत्र करून गोळा तयार करा.

तूप लावणे

Picture Credit: Pinterest

प्लॅटफॉर्मवर बटर पेपर ठेवून मिश्रण लाटा. सुमारे ¼ इंच जाडीपर्यंत लाटावे.

मिश्रण लाटा

Picture Credit: Pinterest

चाकूने डायमंड शेपमध्ये कापा आणि वर चांदीचा वर्ख लावा. थंड झाल्यावर साठवून ठेवा.

 कापा आणि सजवा

Picture Credit: Pinterest