नाश्त्याला बनवा मुगाच्या डाळीचा डोसा

Life style

11 october 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा.

मुगाची डाळ धुवा 

Picture Credit: Pinterest

भिजवलेली डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये घ्या. त्यात हिरवी मिरची, आले आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.

हिरवी मिरची आणि आलं 

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात तांदळाचे पीठ, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकत्र करा.

तांदळाचे पीठ

Picture Credit: Pinterest

डोशाचे पीठ जास्त घट्ट वाटत असल्यास थोडे पाणी घाला. पीठ ओतता येईल इतके पातळ आणि गुळगुळीत ठेवा.

पाणी घाला

Picture Credit: Pinterest

तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. नंतर डोशाचे पीठ तव्यावर ओतून गोलाकार पसरवा.

पीठ पसरवा 

Picture Credit: Pinterest

 डोसा मध्यम आचेवर भाजा. कडा कुरकुरीत होऊ लागल्यावर बाजूने थोडे तेल सोडा आणि डोसा उलटून दुसरी बाजूही भाजून घ्या.

दोन्ही बाजूंनी भाजा

Picture Credit: Pinterest

दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर डोसा ताटात काढा. गरमागरम डोसा नारळाची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest