गव्हाच्या पीठात मीठ आणि थोडं तेल घालून मऊसर, लवचीक कणीक मळून 10 मिनिटे झाकून ठेवावी.
Picture Credit: Pinterest
किसलेल्या मुळ्यात मीठ घालून 5 मिनिटे ठेवावे आणि नंतर त्यातील पाणी हाताने दाबून काढून टाकावे.
Picture Credit: Pinterest
कोरड्या मुळ्यात हिरवी मिरची, आले, तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून भरडी तयार करावी.
Picture Credit: Pinterest
कणकेचे गोळे करून एक गोळा थोडा लाटून त्याच्या मध्यभागी मुळ्याची भरडी ठेवावी.
Picture Credit: Pinterest
भरडी ठेवलेल्या पोळीचे कडे आत घेऊन गोळा नीट बंद करावा आणि हलक्या हाताने गोलसर दाबून ठेवावा.
Picture Credit: Pinterest
भरलेला गोळा हलक्या हाताने गोल पराठा लाटावा. जास्त दाब देऊ नका, भरडी बाहेर येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप/तेल लावून सोनेरी आणि खमंग होईपर्यंत शेकावा.
Picture Credit: Pinterest