एका भांड्यात १ कप बारीक रवा, १/२ कप दही, ½ कप दूध आणि १/२ कप साखर घालून चांगले मिसळा. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
भिजलेल्या मिश्रणात २ चमचे तेल, १/२ चमचा व्हॅनिला इसेन्स आणि आवश्यकतेनुसार थोडे दूध घालून गुळगुळीत बॅटर तयार करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी १ चमचा बेकिंग पावडर आणि १/२ चमचा बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिसळा. बॅटर जास्त घट्ट वाटल्यास थोडे दूध घाला.
Picture Credit: Pinterest
केकच्या भांड्याला तेल लावून त्यावर थोडा रवा किंवा मैदा भुरभुरवा. तयार बॅटर त्यात ओता आणि वरून काजू-बदामाचे तुकडे घाला.
Picture Credit: Pinterest
कुकरमध्ये स्टँड ठेवून झाकण लावा आणि शिट्टी आणि रबर काढून ५-७ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा.
Picture Credit: Pinterest
केकचे भांडे कुकरमध्ये ठेवून झाकण लावा. मध्यम-कमी आचेवर साधारण ३०-४० मिनिटे केक शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
टूथपिक किंवा सुरी घालून केक तपासा. ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे. थंड झाल्यावर तुकडे करून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest