www.navarashtra.com

Published On 23 March 2025 By Nupur Bhagat

मऊ जाळीदार ढोकळा घरी कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Pic Credit -   Pinterest

सकाळच्या नाश्त्यासाठी ढोकळा एक उत्तर पर्याय आहे. हा घरी तयार करणेही फार सोपे आहे

नाश्ता

बेसन, मीठ, तेल, बेकिंग सोडा, साखर, खाण्याचा सोडा, पाणी, कडीपत्ता, मिरची, कोथिंबीर इ.

साहित्य

यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन पीठ, दही, मीठ, हळद, लिंबाचा रस घालून गुळगुळीत पेस्ट बनवा

पेस्ट

तयार मिश्रण 30 मिनिटे झाकण ठेवा. असे केल्याने ढोकळा अधिक चांगला बनेल

झाकण ठेवा

यानंतर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. यात एक स्टँड ठेवा

स्टँड

बेसनाच्या पिठात खाण्याचा सोडा घाला आणि फेटून घ्या. एका भांड्याला तेल लावा आणि त्यात हे मिश्रण ओता

फेटा

 स्टँडवर हे भांडे ठेवा आणि झाकण लावून याला 15 20 मिनिटे वाफवून घ्या

वाफवा

एक पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, हिरवी मिरची, साखर, पाणी घालून फोडणी तयार करा

फोडणी

तयार फोडणी आणि चिरलेली कोथिंबीर ढोकल्यावर टाका आणि चाकूने कापून तयार ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा