मुरमुऱ्यांचा चिवडा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम ठरतो

Life style

22 November, 2025

Author:  नुपूर भगत

कढई गरम करून त्यात मुरमुरे हलकेसे कोरडे भाजून घ्या. ते कुरकुरीत झाले की बाजूला काढा.

मुरमुरे भाजा 

Picture Credit: Pinterest

त्याच कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिरे फोडणीला टाका.

तेल गरम करा 

Picture Credit: Pinterest

हिरवी मिरची, कढीपत्ता, चणा डाळ आणि शेंगदाणे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

साहित्य परता 

Picture Credit: Pinterest

आता यात हळद घाला आणि चांगले मिसळा.

हळद मिसळा 

Picture Credit: Pinterest

यानंतर सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालून थोडेसे भाजून घ्या.

सुका खोबरा

Picture Credit: Pinterest

भाजलेले मुरमुरे कढईत घालून मीठ आणि साखर घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा.

मीठ आणि साखर

Picture Credit: Pinterest

२–३ मिनिटे मंद आचेवर ढवळत भाजून घ्या आणि गॅस बंद करा. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.

डब्यात साठवा

Picture Credit: Pinterest