स्ट्रीट स्टाईल दही कचोरी रेसिपी

Life style

15 october 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, रवा, थोडे मीठ आणि २ चमचे तेल घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि १५  मिनिटे झाकून ठेवा.

कचोरीचे पीठ

Picture Credit: Pinterest

उकडलेले बटाटे मॅश करून त्यात मीठ, लाल तिखट, जिरेपूड आणि थोडी कोथिंबीर घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून सारण तयार करा.

बटाट्याचे सारण बनवा

Picture Credit: Pinterest

पिठाचे छोटे गोळे करून त्यांना पुरीसारखे लाटून घ्या. मध्यभागी बटाट्याचे सारण ठेवा आणि कडा एकत्र करून बंद करा. हलका दाबून कचोरीचा आकार द्या.

कचोरीला आकार द्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा. कचोरी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत हळूहळू तळून घ्या. त्यानंतर टिश्यू पेपरवर काढा.

कचोरी तळून घ्या

Picture Credit: Pinterest

दही चांगले फेटून घ्या. त्यात थोडी साखर आणि चिमूटभर मीठ घालू शकता. दही थंड होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

दही तयार करा

Picture Credit: Pinterest

तळलेल्या कचोरीला हलकेसे फोडून प्लेटमध्ये ठेवा. त्यावर भरपूर फेटलेले दही, चिंचेची गोड चटणी आणि हिरवी तिखट चटणी घाला.

 दही आणि चटण्या घाला

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून जिरेपूड, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शे पसरवा. तयार आहे चटपटीत, कुरकुरीत आणि चविष्ट दही कचोरी! 

सजवून सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest