Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
लहान मुलांना नूडल्स फार आवडतात. अशात तुम्ही घरीच हेल्दी नूडल्स तयार करू शकता
यासाठी प्रथम गव्हाच पीठ चांगलं मळून घ्या
यानंतर पिठाचे गोळे करून लाटा आणि मग चाकूच्या मदतीने त्याच्या लांब पट्ट्या कापा
एका भांड्यात पाणी टाका उकळू द्या. मग यात नूडल्स आणि मीठ घालून नूडल्स छान वाफवून घ्या
आता एका कढईत तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि कोबी परतून घ्या
त्यानंतर यात आलं-लसूण-मिरची पेस्ट, सोया सॉस, शेजवान चटणी आणि काळी मिरी पावडर टाका आणि मिक्स करा
शेवटी यात वाफवलेले नूडल्स घाला आणि काही मिनिटे शिजवून गॅस बंद करा