पावसात दुचाकीची बॅटरी डाउन होऊ नये म्हणून काय कराल?

Automobile

20 August, 2025

Author: मयूर नवले

मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातले आहे.

मुसळधार पाऊस 

Picture Credit:Pinterest

अशातच, जागोजागी पाणी तुंबल्याने दुचाक्यांना त्याचा फटका बसला आहे.

दुचाक्यांना फटका

पावसाळ्यात हमखास दुचाकींची बॅटरी डाउन होते. हे होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल?

बॅटरी डाउन

टर्मिनलवर धूळ, गंज किंवा ग्रीस साचू देऊ नका. वेळोवेळी साफसफाई करा.

बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ ठेवा

बाईक पार्क करताना बॅटरीचा भाग व इग्निशन भाग सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ कव्हर वापरा.

वॉटरप्रूफ कव्हर वापरा 

पावसाळ्यात जास्त हेडलाईट, इंडिकेटर किंवा हॉर्न वापरल्याने बॅटरी जलद डिस्चार्ज होऊ शकते, त्यामुळे वेळोवेळी चार्ज तपासा.

बॅटरी नियमित तपासा 

शक्यतो छताखाली किंवा शेडमध्ये वाहन पार्क केल्यास पावसापासून बॅटरीचे संरक्षण होते.

कोरड्या जागी वाहन  पार्क करा

– पावसाळ्याच्या आधी बॅटरी व इलेक्ट्रिकल सिस्टीमची सर्व्हिस करून घ्या

नियमित सर्व्हिस