Published Oct 23 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
शुगर लेव्हल लो होण्याला वैद्यकीय भाषेत हायपोग्लासेमिया असं म्हणतात
शरीराला एनर्जी देण्यात शुगर लेव्हल महत्त्वाची भूमिका बजावते
रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी टरबूज, संत्र, द्राक्ष ही फळे खा
स्किनच्या रंगात बदल जाणवत असल्यास हे शुगर लेव्हल लो झाल्याचं लक्षण असू शकतं
जास्त भूक लागणं हे शुगर लेव्हल लो आणि हाय दोन्हीचं लक्षण मानलं जातं
.
ओठ, गाल, जिभेला मुंग्या आल्याचं जाणवल्यास शुगर लेव्हल लो झालेली असू शकते
जास्त घाम येणं हे शुगर लेव्हल लो असल्याचं लक्षण असू शकतं
मूड बदलणं, अंधूक दिसणं हीसुद्धा शुगर लेव्हल लो झाल्याची लक्षणं असू शकतात.
यापैकी कोणतीही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.